करनूलमध्ये भीषण अपघात; खासगी बसला लागली आग, 12 प्रवाशांचा मृत्यू

 

जळगाव समाचार | २४ ऑक्टोबर २०२५

आंध्र प्रदेशातील करनूल येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. एका खासगी बसला लागलेल्या आगीत तब्बल 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आग लागली त्या क्षणी बसमध्ये एकूण 42 प्रवासी उपस्थित होते. सर्व जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. एका मोटरसायकलच्या धडकेनंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here