सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्त…

 

जळगाव समाचार डेस्क;

तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आणि झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने ही माहिती दिली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 18 फेब्रुवारी 2023 पासून कार्यरत आहेत.
सीपी राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात झाला. सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. कोईम्बतूरमधून ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते.

नवीन राज्यपालांच्या नियुक्त्यांची यादी

  • सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
  • गुलाबचंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कटारिया यांची जागा आचार्य यांनी घेतली आहे.
  • कटारिया यांची केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
  • हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
  • जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल असतील.
  • ओम प्रकाश माथूर हे सिक्कीमचे नवे राज्यपाल असतील.
  • रामेन डेका यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
  • सीएच विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
  • कैलाशनाथन यांची पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व नियुक्त्या पदभार स्वीकारल्यापासून लागू होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here