Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगखुशखबर; भुसावळ-पुणे-भुसावळ पुन्हा सेवेत येणार ! मंत्री रक्षा खडसेंचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन...

खुशखबर; भुसावळ-पुणे-भुसावळ पुन्हा सेवेत येणार ! मंत्री रक्षा खडसेंचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन…

 

नवी दिल्ली, जळगाव समाचार डेस्क;

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे (Union Minister of State Raksha Khadse) यांच्या पाठपुराव्याने पुणे ते भुसावळ एक्सप्रेस गाडी सुरू होण्याची शक्यता असून त्यांनी या संदर्भात आज रेल्वे मंत्री अश्‍वीनी वैष्णव यांच्याशी भेट घेऊन मागणीने निवेदन सादर केले.
भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु करणे, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणार्‍या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि आधी सुरु असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देणे बाबत, तसेच दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे साठी आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.
जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक असून, कामानिमित्त जाणार्‍यांची संख्या सुद्धा खूप असल्याने भुसावळ-पुणे रेल्वे सुरु करणे बाबत प्रवाश्यांची अनेक दिवसापासून मागणी होती. या अनुषंगाने सदर भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकर सुरु करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी आज रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी बोदवड स्टेशन येथे नवजीवन (१२६५५/१२६५६), सुरत-अमरावती (२०९२५/२०९२६), आजाद हिंद (१२१२९/१२१३०), नांदुरा स्टेशन येथे हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट (१२७१९/१२७२०), प्रेरणा एक्स्प्रेस (२२१३७/२२१३८), गरीबरथ (१२११३/१२११४), रावेर स्टेशन येथे महानगरी (२२१७७/२२१७८), निंभोरा स्टेशन येथे अमृतसर एक्सप्रेस (११०५७/११०५८), भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस टेक्नीकल हाल्ट (२२२२१/२२२२२) तर मलकापूर स्टेशन येथे अमरावती एक्स्प्रेस (२२११७/२२११८), गरीबरथ (१२११३/१२११४) आदी रेल्वे गाड्यांना थांबा देणे बाबत चर्चा केली.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणार्‍या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे दि.१६ जुलै जाण्यासाठी व दि.१७ जुलै परत येण्यासाठी भुसावळ-पंढरपूर-भुसावळ अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडी उपलब्ध करण्यासाठी देखील याप्रसंगी चर्चा करण्यात आली. यावर रेल्वे मंत्र्यांनी अनुकुलता दर्शविली.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page