Monday, December 23, 2024
HomeUncategorizedलग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर विविध ठिकाणी अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर विविध ठिकाणी अत्याचार

भुसावळ- शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या सहा महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीची शुभम शैलेश कोळी रा. थोरगव्हाण ता.रावेर जि.जळगाव याच्याशी ओळख निर्माण झाली होती. याचा फायदा घेऊन शुभम त्याने तरुणीला   लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारानंतर तरूणीने  भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी संशयित शुभम शैलश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ हे करीत आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page