जळगाव समाचार | २० डिसेंबर २०२५
जळगाव येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सिंधूताई कोल्हे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून लोकशिक्षण मंडळाचे चिटणीस श्री. अवधूत पाटील उपस्थित होते. यावेळी एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षा तसेच इयत्ता पाचवी ते नववी व बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस. परीक्षा व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. डी. खडके यांनी केले, तर शाळेचा वार्षिक अहवाल उपमुख्याध्यापक व्ही. आर. कोल्हे यांनी सादर केला. लोकशिक्षण मंडळाचे संचालक पियुषभाऊ कोल्हे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा संदेश दिला. सूत्रसंचालन बी. बी. देवरे व एम. जी. किनगे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय आर. जी. काळे यांनी करून दिला.
याप्रसंगी उपचिटणीस एम. व्ही. खडके, पर्यवेक्षिका बी. एस. राणे, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. येवले, ए. पी. ठाकूर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बक्षीसपात्र विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार यु. जी. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही. एस. निंभोरे, जी. बी. पवार व डी. सी. कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

![]()




