CISF जवानाला स्पाईसजेटच्या महिला कर्मचारीने कानशिलात लगावली; विनयभंगाचा आरोप…

 

जळगाव समाचार डेस्क;

राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पाइसजेट एअरलाइन्सच्या एका महिला कर्मचाऱ्याने जयपूर विमानतळावर सीआयएसएफ कर्मचाऱ्याला कानशिलात मारली. हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये, सीआयएसएफ कर्मचारी आणि स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये कसा वाद सुरू आहे, हे दिसत आहे. वाद सुरू असताना महिलेचा संयम सुटला आणि तिने सीआयएसएफ जवानाला कानशिलात मारली. सध्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा ‘स्पाईसजेट’ची क्रू मेंबर असून तिने सुरक्षा तपासणी न करता वाहनाच्या गेटमधून विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. अनुराधा असे या महिलेचे नाव आहे. एएसआय गिरिराज प्रसादने तिला अडवले तेव्हा ती न तपासता विमानतळावर प्रवेश करत होती. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वाद सुरू असताना अनुराधाचा संयम सुटला आणि तिने गिरीराज प्रसाद यांना चोप दिला. या घटनेनंतर पोलिसांनी स्पाइसजेटची महिला कर्मचारी अनुराधा हिला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
पोलिस उपायुक्त (पूर्व) कवेंद्र सिंह सागर यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी जयपूर विमानतळावर ही घटना घडली जेव्हा सहायक उपनिरीक्षकाने महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा तपासणीशिवाय आत जाण्यापासून रोखले. त्यांनी सांगितले की जेव्हा तिला सुरक्षा तपासणीसाठी थांबवण्यात आले तेव्हा महिला आणि सीआयएसएफ जवानांमध्ये वाद झाला आणि महिलेने शिपायाला कानशिलात मारली. अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी विमानतळावर एकही महिला कर्मचारी नव्हती, त्यामुळे तपासासाठी एक पुरुष कर्मचारी तैनात करण्यात आला होता.
स्पाईसजेट महिला कर्मचाऱ्यासोबत आहे
याप्रकरणी स्पाइसजेट कंपनीचे वक्तव्य आले आहे. आज, जयपूर विमानतळावर स्पाइसजेटची एक महिला सुरक्षा कर्मचारी आणि पुरुष CISF कर्मचारी यांचा समावेश असलेली एक दुर्दैवी घटना घडली, असे कंपनीने म्हटले आहे. स्टील गेटवर कॅटरिंग वाहन घेऊन जात असताना, आमच्या महिला सुरक्षा कर्मचारी सदस्य, ज्यांच्याकडे भारताच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा नियामक ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) द्वारे जारी केलेला वैध विमानतळ प्रवेश पास होता, आमच्या महिला कर्मचारीला अस्वीकारार्ह भाषेचा सामना करावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सीआयएसएफ जवानांवर दोषारोप केला आणि सांगितले की, त्यांनी त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी भेटण्यास सांगितले होते.
कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, स्पाइसजेट आपल्या महिला कर्मचारीच्या लैंगिक छळाच्या या गंभीर प्रकरणात त्वरित कायदेशीर कारवाई करत आहे आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आहे. आम्ही आमच्या कर्मचारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्याला पूर्ण पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here