आकाशवाणी चौकात भीषण अपघातात महिलेचा एक हात व एक पायाचा अक्षरशः चेंदमेंदा…

जळगाव समाचार | ६ मार्च २०२५

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आज गुरुवारी (६ मार्च) सायंकाळी ५ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात महिलेचा एक हात व एक पाय तुटून गंभीर दुखापत झाली आहे. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रागीणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. साई नगर, भुसावळ) आणि त्यांचे पती चंपालाल पाटील हे दुचाकीने (क्रमांक MH19 DP 2467) आकाशवाणी चौकातून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक CG 04 LB 9999) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रागीणी पाटील रस्त्यावर पडल्या त्यात त्यांचा एक हात व एक पाय पूर्णतः तुटला. याघटनेत त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here