जळगाव : शहरातील प्रभात चौकातील उड्डाणपुलावरुन जात असतसांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अक्षय दर्शन गोयर (वय ३१, रा. नवल कॉलनी, सिंधी कॉलनीजवळ) हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवल कॉलनीत अक्षय दर्शन गोयर हा तरुण राहत असून तो शहरातील प्रभात चौकातील
उड्डाणपुलावरुन दुचाकीने जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दरम्यान, दुचाकीसह तरुण कठड्याला धडकला. त्यात त्याच्या उजव्या हाताला मार लागला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा अपघात दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शरीफ शेख करीत आहेत.