आरोपीने लाचेचे पैसे टॉयलेटमध्ये मध्ये टाकले, ACB ने गटारातून पैसे काढत जेल मध्ये टाकले…

 

जळगाव समाचार डेस्क | ६ सप्टेंबर २०२४

 

मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, पुन्हा एकदा लाच प्रकरणाने हादरली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ फायर ऑफिसरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अधिकाऱ्याने हुशारीने लाच म्हणून घेतलेली रक्कम थेट कार्यालयातील टॉयलेटमध्ये टाकून दिली. या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये चर्चेचे वादळ उठले आहे.
घटनेचे मूळ बोरिवली येथील एका रेस्टॉरंटला पाईप नॅचरल गॅसचं कनेक्शन हवे होते. या कनेक्शनसाठी संबंधित व्यक्तीने पालिकेच्या वरिष्ठ फायर ऑफिसर प्रल्हाद शितोळे यांच्याशी संपर्क साधला. शितोळे यांनी पाहणी करून दीड लाख रुपयांची लाच मागितली. अखेर, तडजोडीनंतर लाचेची रक्कम 60 हजारांवर ठरली.
लाच मागणीचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीने थेट ACBकडे तक्रार केली. ACB अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि पीडित व्यक्तीला खूण केलेल्या नोटांसह शितोळेंकडे पाठवले. मात्र, शितोळेंना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी लगेच नोटा कार्यालयाच्या टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केल्या.
शितोळे यांना अटक केल्यानंतर ACB अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. शितोळे यांनी लाच म्हणून मिळालेली रक्कम टॉयलेटमध्ये टाकल्याचे कबूल केले. त्यानंतर ACBच्या पथकाने तब्बल 20 गटारं उघडून 57 हजार रुपयांची नोटा शोधून काढल्या. मात्र, अजूनही तीन हजार रुपये सापडलेले नाहीत.
ACBने पुराव्यांसाठी जप्त केलेल्या नोटांसोबतच शितोळेंचे शर्ट, बाथरूमचे लॉक आणि फिनोलफथेलिन पावडरचे नमुनेही जप्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here