जळगाव समाचार | ७ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भाप्रसे अधिकारी श्री. रोहन घुगे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे या पदावरून बदली करून जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आली आहे.