Breaking: आमदार सांस्कृतिक महोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा: जिल्हास्तरीय ढोलताशा स्पर्धेचे आयोजन, मोठ्या रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव

जळगाव समाचार डेस्क। १८ ऑगस्ट २०२४

जळगाव शहरात आमदार राजू मामा भोळे यांच्या पुढाकाराने आयोजित आमदार सांस्कृतिक महोत्सवात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी महोत्सवाचे उद्घाटन करताना मोठी घोषणा केली. त्यांनी पुढील आठवड्यात जिल्हास्तरीय ढोलताशा स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा केली. या स्पर्धेत मोठ्या रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जिल्ह्यातील ढोलताशा पथकांची कला अधिक प्रोत्साहन मिळावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळेल आणि त्यांची कला राज्यभरात पोहोचेल.”

व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/share/v/7pypvSouXCTd7Gmz/?mibextid=uSdriS

आमदार राजू मामा भोळे यांनी मंत्री महाजन यांच्या या घोषणेचे स्वागत करत, या स्पर्धेसाठी आवश्यक तयारी केली जाईल, असे सांगितले. महोत्सवातील उपस्थितांनी या घोषणेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

यापूर्वी आयोजित लेझीम आणि ढोलताशा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पथकांनी आपल्या कला कौशल्याचे दर्शन घडविले होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या घोषणेमुळे आता या स्पर्धांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या महोत्सवासाठी आपले योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि कलाकारांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here