जहाँआरा पटेल यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार…

 

जळगाव समाचार डेस्क| २४ जुलै २०२४

खानदेश स्टार पुरस्कार कमिटी तर्फे “आदर्श शिक्षिका पुरस्कार वर्ष 2024” वितरण सोहळा जळगाव (Jalgaon) येथे पार पडला. या सोहळ्यात पटेल जहाँआरा अब्दुल मुनाफ यांना “आदर्श शिक्षिका पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
पटेल जहाँआरा या उर्दू शाळेत मुख्याध्यापिका असून त्या 25 वर्षांपासून शैक्षणिक श्रेत्रात कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून ते शैक्षणिक व सामाजिक श्रेत्रात योगदान देत आहेत. त्या आपल्या शाळेत सतत विविध उपक्रम राबवत असतात. त्या मुलींनी शिकावे व सुसंस्कृत व्हावे यासाठी त्या अनेकांना मार्गदर्शन करत असतात. त्या म्हणता कि, मुलगी शिकली अशाप्रकारे शिकली तर समाज आपोआप पुढे जातो.
पटेल जहाँआरा यांना घरातूनच शिक्षकी पेशाचे धडे मिळाले. त्यांचे वडील हाजी अब्दुल मुनाफ अब्दुल मजीद येवला, जिल्हा नाशिक उर्दू हायस्कूल येथे मुख्याध्यापक होते. तर त्यांचे सासरे हाजी गुलाब नूर मुहम्मद पटेल धुळे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी वरिष्ठ सहाय्यक होते. तर त्यांचे पती सलिम हाजी गुलाब पटेल धुळे येथे मराठी शिक्षक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here