जळगाव समाचार | २६ नोव्हेंबर २०२५
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. खडके यांच्या हस्ते भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या कल्पना बेलसरे, सविता चिमकर, सरला गाढे यांची उपस्थिती होती. यावेळी बी. बी. देवरे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती देत लोकशाहीची पायाभरणी सांगितली.
संविधान दिनानिमित्त विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी भव्य संविधान रॅली काढून जनजागृती केली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी “मानवी साखळी” तयार करून ‘संविधान’ हा शब्द साकारला. या उपक्रमासाठी कला शिक्षक जी. एस. भारूळे, ए. के. नांदूरकर, जी. बी. पवार व क्रीडा शिक्षक एस. एम. झोपे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. डी. खडके, उपमुख्याध्यापक व्ही. आर. कोल्हे, उपचिटणीस एम. व्ही. खडके, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. येवले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संविधान मूल्यांची जपणूक आणि विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाचे भान निर्माण करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला.

![]()




