महिलेच्या डोळ्यातून चक्क काढल्या 60 जिवंत अळ्या….

 

जळगाव समाचार डेस्क| ७ ऑगस्ट २०२४

बुलढाणा जिल्ह्यातील मोरवाल हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या डोळ्यातून डॉक्टरांनी तब्बल ६० जिवंत अळ्या काढल्या आहेत. चिखली येथील मोरवाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे आणि या महिलेचा डोळा वाचवला आहे. अळ्या काढण्यासाठी दोन तासांचा वेळ लागला होता.
ही घटना मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेसोबत घडली. शेतात काम करताना त्यांच्या डोळ्यात मातीचे ढेकुळ लागल्यामुळे त्रास होऊ लागला होता. तपासणीनंतर त्यांच्या डोळ्यात अळ्या आढळल्या आणि डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून त्या काढण्याचे ठरवले.
विशेष म्हणजे, डॉ. मोरवाल यांनी या शस्त्रक्रियेबद्दल कोणतीही फी घेतली नाही. शस्त्रक्रियेदरम्यान ६० जिवंत अळ्या काढण्यात आल्या आणि आता महिलेचा डोळा पूर्णपणे स्वस्थ आहे. यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here