नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क| २७ जुलै २०२४

नवी मुंबईतील बेलापूर परिसरात शनिवारी सकाळी तीन मजली इमारत कोसळली. इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. एनडीआरएफच्या (NDRF) अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, शाहबाज गावात पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
ते म्हणाले की, इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची सुटका केली आहे, तर एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघाताबाबत माहिती देताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे म्हणाले, “ही इमारत आज पहाटे ५ वाजण्यापूर्वी कोसळली. सेक्टर-१९, शाहबाज गावातील ही जी+३ इमारत आहे. ती ३ मजली इमारत होती. इमारतीतून 52 जण सुखरूप बाहेर आले आणि ढिगाऱ्यात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात यश आले असून आणखी 2 लोक अडकल्याची शक्यता आहे. कैलास शिंदे पुढे म्हणाले, एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहे. ज्या दोघांना वाचवण्यात आले आहे ते रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही इमारत 10 वर्षे जुनी आहे, दरम्यान याबाबत चौकशी सुरू असून इमारत कोणाच्या मालकीची आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here