जळगाव समाचार डेस्क;
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहा महत्वपूर्ण बदल करून राज्य सरकारने महिलांना या योजनेची रक्कम कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेची रक्कम 19 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या महिलांच्या कागदपत्रात काहीच अडचण नाही अशा सर्व महिलांना त्याच दिवशी दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत हे मुख्य 6 नवीन नियम आणि अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत…
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
2. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे
3. ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे.
4. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
5. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
6. ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा
या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे असतील पात्र…
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
कोणती कागदपत्रं लागणार?
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

![]()




