समता नगरात विहिरीत 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ…

 

जळगाव समाचार डेस्क| २४ जुलै २०२४

जळगाव (Jalgaon) शहरात एका 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने समता नगर भागात एकच खळबळ उडाली आहे. सोनू राजू बनसोडे असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनू राजू बनसोडे (27) हा युवक आपली आई आणि बहिणीसह समता नगरात राहत होता.दरम्यान हा तरुण बाहेर जाऊन येतो असे सांगून दि 23 मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेदरम्यान घरून निघाला मात्र तो बराच वेळ न परतल्याने त्याच्या आईने त्याचा सर्वत्र शोध घेतला.
चपलांमुळे मृतदेहाची ओळख पटली…
दरम्यान काल बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास समता नगरातील विहिरीत काही जणांना चपला दिसून आल्या. सोनूच्या आईने त्या बघून या सोनुच्याच चपला म्हणत एकच आक्रोश केला. दरम्यान यावेळी पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तीने विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here