एकाच छताखाली रेस्टॉरंट, आलिशान रूम्स आणि टेरेस किचन
जळगाव समाचार | २१ नोव्हेंबर २०२६
जळगाव शहराच्या आतिथ्य आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रात आता एका नव्या दिमाखदार पर्वाची सुरुवात होत आहे. शहरातील आकाशवाणी चौक परिसरात अत्याधुनिक सुविधा आणि आकर्षक वास्तुरचनेने सज्ज असलेले ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून जळगावकरांच्या सेवेत दाखल होत आहे. पंचतारांकित हॉटेलचा अनुभव देणारे, प्रशस्त जागा, दर्जेदार आदरातिथ्य आणि विविध सुविधांनी परिपूर्ण असे हे हॉटेल शहरवासीयांसह बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
काके दी हट्टी : १०० पेक्षा अधिक खाद्यपदार्थांची मेजवानी
हॉटेल राविस्तामधील आकर्षणाचे प्रमुख केंद्र म्हणजे ‘काके दी हट्टी’ हे रेस्टॉरंट. उत्तर भारतात १९४२ पासून सेवा देणाऱ्या हा संस्थेकडून किचनचे व्यवस्थापन सांभाळले जात आहे. हॉटेलमध्ये १०० पेक्षा अधिक प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल २ फूट लांबीचे नान हे या रेस्टॉरंटचे खास आकर्षण असणार आहे. कुटुंबीयांसोबत भोजनाचा आनंद घेण्यासाठी तसेच मित्रमंडळींसोबत खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी हे रेस्टॉरंट एक खास ठिकाण ठरणार आहे.
३३ आलिशान रूम्स; आरामदायी मुक्कामाची सुविधा
हॉटेल राविस्ताची सात मजली भव्य इमारत पाहुण्यांच्या आरामदायी वास्तव्याच्या दृष्टीने साकारण्यात आली आहे. येथे एकूण ३३ सुसज्ज रूम्स उपलब्ध असून त्यामध्ये डिलक्स, सुपर डिलक्स आणि सूट रूम्सचा समावेश आहे. त्यामुळे व्यावसायिक कामानिमित्त, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी किंवा पर्यटनासाठी जळगावात येणाऱ्या पाहुण्यांना दर्जेदार निवासाची सुविधा मिळणार आहे.
टेरेस किचन रेस्टॉरंट अन् गॅलरी व्ह्यूचा खास अनुभव
हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टेरेसवरील किचन रेस्टॉरंट. शहराचे विहंगम दृश्य अनुभवत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी येथे मिळणार आहे. आकर्षक गॅलरी व्ह्यू आणि आधुनिक रचनेमुळे हॉटेलला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे ओपन टेरेसचा अनुभव देणारे रेस्टरांट असल्याने कोणत्याही ऋतूत मोकळ्या आकाशात, हवेशीर वातावरणात कुटुंबासह जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.
प्रशस्त पार्किंग आणि मध्यवर्ती ठिकाण
हॉटेल राविस्ताचे स्थानही अत्यंत सोयीचे आहे. आकाशवाणी चौक परिसरात असलेले हे हॉटेल रेल्वे स्टेशन, बसस्थानक, ट्रॅव्हल्स स्टॉप तसेच महामार्गाच्या जवळ असल्याने प्रवाशांना येथे पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. वाहनधारकांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जळगावातील शुद्ध शाकाहारी लॉजिंग हॉटेल
हॉटेल राविस्ताचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जळगावातील पहिले शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आणि लॉजिंग सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हॉटेल असल्याचा संचालकांचा दावा आहे. दर्जेदार भोजन, आलिशान निवास आणि आधुनिक सुविधांचा संगम येथे अनुभवता येणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील अनुभव आता आदरतिथ्याच्या क्षेत्रात
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक रामसहाय शर्मा आणि रजनील शर्मा यांच्या संकल्पनेतून हॉटेल राविस्ता साकारण्यात आले आहे. हॉटेल आजपासून जळगावच्या आदरातिथ्य क्षेत्रात नवी ओळख निर्माण करण्यास सज्ज झाले आहे. शहरात प्रथमच पंचतारांकित हॉटेलचा फिल देणाऱ्या या भव्य हॉटेलमुळे जळगावकरांना आता आरामदायी निवास आणि रुचकर शुद्ध शाकाहारी भोजनासाठी एक नवे आकर्षक ठिकाण उपलब्ध झाले आहे.

![]()







