अमळनेर तालुका हादरला; एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेसमोर झोकून देत…


जळगाव समाचार | २७ ऑगस्ट २०२६

अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या सामूहिक आत्महत्येने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील  टाकरखेडा येथे सुनील अमृत भिल, पत्नी पार्वती, मुलगा सनी व राज यांना पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून रेल्वे रुळाजवळ घेऊन गेले, दरम्यान त्यांनी रेल्वे समोर झोकून दिले. घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, हे.कॉ. संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल, राहुल पाटील हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

अख्ख्या कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवल्याच्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here