जळगाव समाचार | ८ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी Live Trend, Jalgaonचे पत्रकार प्रविण श्रावण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून कार्यरत असलेले प्रविण पाटील जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना संघटित करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच संघटनेचा जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी कार्य करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी सचिन गोसावी, नगराज पाटील, भूषण महाजन, भगवान मराठे, संतोष नवले, योगेश सैतवाल, गोपाल सोनवणे, संजय चौधरी, अबरार मिर्झा, चंदू खरे आदींनी शुभेच्छा दिल्या.

![]()





