ब्रेकिंग; श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरातून देवीचा मुकुट, आभूषणांची चोरी; CCTV बंद असल्याने चोरट्यांना आयती संधी?

 

जळगाव समाचार | ८ ऑगस्ट २०२६

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनुदेवी मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवीचा मुकुट तसेच काही आभूषणांची चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये देवीचा मुकुट आणि काही दागिन्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मंदिर परिसरातील CCTV यंत्रणा बंद असल्याची बाबही समोर आली आहे. मंदिराला पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने CCTV यंत्रणेचा मेंटेनन्स करणे शक्य होत नसल्याचे कारण पुढे आले आहे.

त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, CCTV बंद असतानाच चोरीची घटना घडल्याने मंदिर व्यवस्थापनाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

चोरी नेमकी किती किमतीची आहे, चोरट्यांनी मंदिरात प्रवेश कसा केला आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here