मुक्ताईनगर एका सात वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पंधरा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडकीस आली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सात वर्षीय मुलीला पंधरा वर्षे मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर 15 दिवसांपूर्वी अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. तसेच त्या अल्पवयीन मुलाने मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर हा अत्याचार केल्याची माहिती पीडित बालिकेने घरच्यांना दिली. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.