जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बदली; मीनल करनवाल नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी…

जळगाव समाचार | १८ मार्च २०२५

राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.

त्यांच्या जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

राज्य शासनाने १८ मार्च २०२५ रोजी अधिकृत आदेश काढून विविध आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. या निर्णयानुसार, राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here