जळगाव समाचार डेस्क| १ सप्टेंबर २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्वसमावेशक सर्व समाज घटकांना न्याय देण्याची विचारसरणी आणि आदरणीय शरद पवार यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर चालणारा पक्ष असून, सर्व समावेशक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी व महिला, नवतरूणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही सर्वांनी प्रवेश केला तुमचे स्वागत आणि आभार. तुम्हा सर्व नवतरुणांचा उत्साह आणि ताकद पक्षाला निश्चितच बळ देईल. आगामी काळात सर्व मिळून एकजुटीने कार्य करू पक्षाचे ध्येय धोरणे,कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवू आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त करून कोणत्याही सुखदुःखात आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असून तुम्हीं सर्व गावाच्या विकासासाठी आमच्यासोबत आला आहात. आगामी काळात गावाच्या विकासासाठी निश्चित पाठपुरावा करू व विकासकामे मार्गी लावू असे सर्वांना आश्वस्त केले.
यांनी केला प्रवेश – विशाल सुरवाडे, प्रविण धुंदले, रतन बोदडे, सुभाष सुरवाडे, समाधान सावळे, आनंदा धुंदले, विकास मोरे, रमेश सावळे, राहुल सावळे, दिपक सुरवाडे, निलेश बोदडे, राजेश सावळे, सागर तायडे, गौरव तायडे, अजय बोदडे, गौतम सावळे, प्रमोद बोदडे, पंडित सावळे, श्रीकृष्ण धुंदे, भारत तायडे, युवराज तायडे, रोहित तायडे, दिनेश बोदडे, रामदास धुंदे, अविनाश धुंदे, हर्षल सावळे व इतर युवकांचा समावेश आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र (सोनू)पाटिल, बापू ससाणे, निलेश भालेराव, निलेश पाटील, प्रदिप साळुंखे, सुनिल पाटील, संजय कोळी, रऊफ खान, रफिक मिस्त्री, राहुल पाटील, चेतन राजपूत, बाळा चिंचोले, विजय शिरोळे, निवृत्ती कोळी, मुश्ताक मण्यार, फिरोज सय्यद, दर्शन ठाकूर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

![]()




