जळगाव समाचार डेस्क;
यावल तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. यावल पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील साकळी येथे वास्तव्यास असणारा मुकेश माधव गजरे याला अनेक दिवसांपासून पोटाचा गंभीर आजार होता. आणि याच आजारपणाला कंटाळून 1 जुलैच्या मध्यरात्री आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा थांबवली. ही घटना लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणी करुन त्याला मृत घोषित करण्यात आले. याबात यावल पोलिसात मयताचा भाऊ राकेश गजरे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.