जळगाव समाचार डेस्क;
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे माहेर असणाऱ्या विवाहितेने मोबाईल मध्ये नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 24 वर्ष वय असणाऱ्या मयत विवाहितेचे नाव जागृती सागर बारी असे आहे. तिच्या शेवटच्या नोट मध्ये तिने आपली व्यथा मांडत सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरले, याप्रकरणी मयताच्या माहेरच्यांकडून डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. (Suicide)
याबाबत प्राप्त माहिती नुसार, कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी गजानन भिका वराडे यांची कन्या जागृती हिचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी (32) मुंबई पोलीस कर्मचारी याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी झाला होता.
आपली मुलगी 21 जून रोजी मुंबई येथे पतीकडे राहायला जाणार असल्याने तिचे आई वडिलांनी तिला पिंप्राळा येथे भेटायला गेले मात्र त्यावेळी सासू शोभा रामलाल बारी यांनी हुंड्याची मागणी केली, त्या म्हणाल्या कि तुम्ही लग्नात हुंडा नाही दिला पण आता मुलाला मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या.
मात्र मुंबईत गेल्यानंतर थेट 5 जुलैला जागृतीचा पती सागरचा फोन भाऊ विशालला आला. त्याने सांगितले कि, तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला आणि फोन कट केला.
फोन ऐकून तिचे वडील, आई आणि काही नातेवाईक लगबगीने थेट मुंबईत पोहोचले. यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे पिंप्राळ्यातील सासूची मागणी बद्दल सांगत तक्रार केली. सोबत जागृती आणि त्यांच्यातला झालेला संवादही त्यांनी कथन केला कि, “आई माझी सासू मला तू काळी आहेस, मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे”, असं जागृती आपल्याला म्हणाल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे.
दरम्यान घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक आणि मानसिक छळ करणं, असे गुन्हे जागृतीचा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत.
अस संपवलं जीवन
सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिने बाहेरून घराला कुलूप लावलं, यानंतर जागृती 200 लिटर पाण्याच्या ड्रमची मदत घेऊन फॅनखाली उभी राहिली आणि ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास लावून घेतला.
मोबाईल मध्ये मिळाली शेवटची नोट
जागृतीचा मोबाईल लॉक असल्याने सागरला उघडता आला नाही. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली, ज्यात जागृतीने सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं होतं. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे.