(विक्रम लालवाणी)पारोळा – प्रतिनिधी
पारोळा येथील स्वामीनारायण नगर येथील रहिवासी वायरमन दिनेश श्यामकुमार पाटील (३२) यांचा म्हसवे शिवारातील नगाव रस्त्यावर विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विज प्रवाहा सुरू झाल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.
घटनेनंतर जमावाचा ठिय्या…
पारोळा येथील झिरो वायरमन दिनेश पाटील हा कंत्राटी कामगार होता. त्यामुळे त्याला विज वितरण विभागाकडून मदत देण्यास असमर्थता दर्शवल्याने, स्वामीनारायण नगर येथील रहिवाश्यांनी विज वितरण कार्यालयासमोर ठिय्या देऊन आंदोलन केले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी मध्यस्थी करीत नागरिकांना राज्य सरकार कडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.