सावधान; विनापरवानगी झाड तोडल्यास होणार 50 हजाराचा दंड…

 

जळगाव समाचार डेस्क। ८ ऑगस्ट २०२४

विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या अशा प्रकरणांमध्ये फक्त 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
विनापरवानगी झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंडाशिवाय, तोडलेले झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये दुरुस्ती करून या संदर्भातील अध्यादेश मांडण्यात येईल.
झाडांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे विनापरवानगी झाड तोडणाऱ्यांना आता कठोर शिक्षा होणार आहे.
अधिनियमातील दुरुस्ती
महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये दुरुस्ती करून नव्या तरतुदी लागू केल्या जातील. या दुरुस्तीमुळे राज्यातील वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यात मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here