जळगाव समाचार | १२ मे २०२५
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली.
यापूर्वी कोहलीने बीसीसीआयला निवृत्तीबाबत कळवले होते. मात्र, मंडळाने त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
बॉर्डर-गावस्कर मालिकेत कोहलीची कामगिरी काहीशी अपेक्षेप्रमाणे नव्हती. त्याने ९ डावांत १९० धावा केल्या, ज्यात एक नाबाद शतक होते. त्याची सरासरी २३.७५ इतकी होती आणि तो ७ वेळा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूंवर बाद झाला. गेल्या ५ वर्षांत त्याने ३७ कसोटींमध्ये फक्त ३ शतके केली असून त्याची सरासरी ३५ पेक्षा कमी आहे.
कोहलीने याआधी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएल २०२५मध्ये त्याने दमदार खेळ केला आहे. ११ सामन्यांत त्याने ५०५ धावा करत उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे.
विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.