जळगाव समाचार | २२ एप्रिल २०२५
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी, २२ एप्रिल रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यावर्षी प्रयागराजच्या शक्ती दुबे हिने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, हरियाणाची हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानी आहे. तर पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ वर सर्व यशस्वी उमेदवार निकाल पाहू शकतात. या परीक्षेअंतर्गत प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात.
या निकालामधून एकूण १,००९ उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि गट ‘A’ व गट ‘B’ च्या विविध केंद्रीय सेवांमध्ये निवड झाली आहे.

![]()




