जळगाव समाचार डेस्क | २७ डिसेंबर २०२४
आज (२७ डिसेंबर) आणि उद्या (२८ डिसेंबर) पावसाचा अंदाज योग्य ठरत, जळगाव शहरात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे शहरात हलक्या-फुलक्या सरी आणि मेघगर्जना होऊ लागल्या आहेत. विशेषतः, आजची दांडगी लग्नतिथी असल्याने, पावसामुळे लग्नघरांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी पावसामुळे तयारीला अडचणी आल्या असून, लग्न समारंभांच्या आयोजनात काहीऐंशी समस्या निर्माण झाल्याचे चित्र होते.
अवकाळी पावसाचा प्रभाव पुढील दोन दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.