जळगाव समाचार | २७ मे २०२५
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात सोमवारी २६ मे रोजी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये महसूल विभागातील एकूण 198 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून, महसूल यंत्रणेत लक्षणीय फेरबदल झाल्याचे चित्र आहे.
बदल्यांचा तपशील
• सहाय्यक महसूल अधिकारी – 53
• महसूल सहाय्यक (क्लर्क) – 44
• मंडलाधिकारी – 35
• चालक – 5
• तलाठी – 58
यासोबतच 3 तलाठ्यांना मंडलाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
हवामानाच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचे महत्त्व
सध्या जिल्ह्यात हवामानात अचानक बदल होत असून, अनेक भागांतील शेतकऱ्यांना पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत महसूल यंत्रणेतील ही बदल्यांची प्रक्रिया अधिक प्रभावी कार्यवाहीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
या बदल्यांमुळे महसूल विभागात कार्यक्षमतेत वाढ होईल, तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींवर वेळीच कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.