जळगाव समाचार डेस्क;
नाशिक परिक्षेत्रात कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी (ता.२०) जुलै रोजी रात्री बदल्यांचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार ३० अधिकाऱ्यांची जळगाव जिल्ह्यातून बदली झाली असून नवीन २४ अधिकारी जळगावात बदली होऊन येणार आहेत.(Jalgaon)
जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे व अमळनेर येथून नियंत्रण कक्षात आलेले विजय शिंदे यांनी जिल्ह्यांतर्गत बदलीची विनंती केल्यानुसार जामनेर येथील पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर तर नियंत्रण कक्षाचे विजय शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात नंदुरबार येथील राहुलकुमार पवार व नीलेश गायकवाड हे दोन पोलिस निरीक्षक येत आहेत.
बदली झालेले व येणारे सहाय्यक निरीक्षक (कंसात संध्याची नेमणूक) – गणेश शिवाजी म्हस्के (नाशिक) जळगाव, योगिता मधुकर नारखेडे (नाशिक ग्रा) जळगाव, अमितकुमार प्रतापसिंग बागूल (नंदुरबार)जळगाव, अनिल लोटन वाघ आणि जयेश पिराजी पाटील (नाशिक ) जळगाव, रवींद्र नारायण पिंगळे, प्रमोद वाघ आणि नितीन नारायण रणदिवे, (अहमदनगर) जळगाव, संदीप अशोक हजारे (जळगाव) अहमदनगर, शीतलकुमार नाईक जळगावी मुदतवाढ, रवींद्र पांडुरंग बागूल(जळगाव) नंदुरबार, रूपाली संभाजी चव्हाण (जळगाव) नाशिक ग्रामीण, अनिल छबू मोरे व मीना तडवी आणि नीलेश गायकवाड(जळगाव) मुदतवाढ, उमेश बोरसे, दीपक बिरारी, अमोल मोरे, राहुल मोरे (जळगाव) नाशिक ग्रामीण, तुषार देवरे (जळगाव) धुळे, किशोर पवार, संदीप परदेशी, गणेश अहिरे, अमोल पवार आणि हरीश भोये (जळगाव) अहमदनगर, विनोदकुमार गोसावी (जळगाव) नंदुरबार, दिनेश भदाने (नंदुरबार) जळगावी बदली करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक) – गणेश चौभे (जळगाव) नाशिक ग्रामीण, विनोद मधुकर खांडबहाले(जळगाव) अहमदनगर, अमोल किशन गुंजाळ (जळगाव) नंदुरबार, संदीप श्रीराम चेडे (जळगाव) नाशिक ग्रामीण, विजय रामसिंग वसावे (जळगाव) नंदुरबार, अविनाश लक्ष्मण दहिफळे (जळगाव) धुळे, गणेश मुरलीधर मुर्हे (जळगाव)नंदुरबार, माया नारायणसिंग राजपूत (नंदुरबार) जळगाव, राहुल शिवाजी सानप, मनोज जनार्दन महाजन आणि सोपान रमेश गोरे या तिघांची (अहमदनगर) जळगाव येथे बदली झाली आहे.