जळगाव समाचार | १ मार्च २०२५
भुसावळ विभागात जळगाव-भादली स्थानकांदरम्यान चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा पूल तरसोद-फागणे (NH-6) महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. यामुळे अप, डाऊन तसेच तिसरी आणि चौथी लाईनवर रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून, काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
गाड्यांच्या वेळेत बदल:
शनिवार, 1 मार्च
• अगरतला – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (12520) – 1 तास 15 मिनिटे उशीर
• भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (12335) – 45 मिनिटे उशीर
• गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (15018) – 45 मिनिटे उशीर
• छपरा – सुरत एक्सप्रेस (19046) – 30 मिनिटे उशीर
• भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर (59076) – 2 तास उशीर
रविवार, 2 मार्च
• गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (15018) – 45 मिनिटे उशीर
• छपरा – सुरत एक्सप्रेस (19046) – 30 मिनिटे उशीर
• पटना – वास्को दि गामा एक्सप्रेस (12742) – 45 मिनिटे उशीर
• भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर (59076) – 2 तास उशीर
सोमवार, 3 मार्च
• लखनौ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (22122) – 1 तास 15 मिनिटे उशीर
• गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (15018) – 45 मिनिटे उशीर
• छपरा – सुरत एक्सप्रेस (19046) – 45 मिनिटे उशीर
• भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (22311) – 45 मिनिटे उशीर
• भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर (59076) – 2 तास उशीर
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन केले आहे.

![]()