धक्कादायक; राज्यात या शहरात मालगाडी पलटवण्याचा कट उघडकीस…

जळगाव समाचार डेस्क | ११ सप्टेंबर २०२४

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकवर मोठा सिमेंटचा दगड सापडला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला. या प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंत्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

नेमके काय घडले?
हा प्रकार ४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे घडला. सायंकाळी ७:५० ते ८:३० या वेळेत असामाजिक घटकांनी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर सिमेंटचा मोठा ब्लॉक ठेवला होता. ट्रॅकवर काम करणाऱ्या देखभाल पथकाला हा सिमेंट ब्लॉक सर्वप्रथम आढळून आला. पथकाने तत्काळ याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. यानंतर कुर्डुवाडी जीआरपीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. या घटनेनंतर जीआरपीने रेल्वे प्रशासनाला ट्रॅकच्या दोन्ही बाजूंच्या कुंपणासाठी आणि रेल्वे स्थानकांवर लांब पल्ला कव्हर करणारे सीसीटीव्ही लावण्याची शिफारस केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here