वाघाच्या कातडीसह टोळीला नशिराबाद टोल नाक्यावर अटक…

 

जळगाव समाचार डेस्क;

वन खात्याच्या अंतर्गत असलेल्या कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत नशिराबाद येथील टोल नाक्यावर वाघाच्या कातडीसह तस्करी करणार्‍या टोळीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने वाघाच्या शिकारीच्या घटनांना पुन्हा तोंड फुटून मोठी खळबळ उडाली आहे.(Jalgaon)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वन खात्याला नशिराबाद टोल नाका येथे वाघांच्या कातडीसह एक टोळी आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार, खात्याच्या अंतर्गत असलेल्या कस्टम विभागाने कारवाई करत दोन मोटारसायकलींवरून एकूण सहा जण जात असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली. दरम्यान या वाघाची शिकार मध्यप्रदेशात करून याची कातडी महाराष्ट्रात विकण्यासाठी आणली असल्याचा अंदाज सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
2 महिला व 4 पुरुषांची टोळी..
या आरोपींमध्ये अटक करण्यात आलेल्यांची नावे ही आहेत. अजवर सुजात भोसले (35), रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, कंगनाबाई अजवर भोसले (30), रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, रहीम रफीक पवार, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, तेवाबाई रहीम पवार, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, मोहंमद अतहर खान (५८), रा भोपाळ, मध्यप्रदेश नदीम गयासुद्दीन शेख (२६) रा.अहमदनगर जि.अहमदनगर या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात वन्य खात्याच्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here