जळगावात पत्रकाराच्या घरात भरदिवसा चोरी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास…


जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५

शहरातील महाबळ रस्त्यावरील अरुंधती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पत्रकाराच्या घरात भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली आहे. ही घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण आपल्या कुटुंबासह या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. आज त्यांच्या पत्नी दोन्ही मुलांना घेऊन शेजारीच असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या असता, ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि कपाटातील सुमारे ७ ग्रॅमची सोन्याची चैन, ५ भारचे चांदीचे ब्रासलेट आणि ८५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

अर्ध्या तासातच ही चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला. चव्हाण यांच्या पत्नी घरी परतल्यावर त्यांना दरवाजा उघडलेला दिसला आणि चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

शेवटचे वृत्त मिळेपर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here