शहरात टेन्ट हाऊसच्या गोडावूनला आग; २५ ते ३० लाखांचे नुकसान…

जळगाव समाचार डेस्क | २३ जानेवारी २०२५

शहरातील मास्टर कॉलनीत असलेल्या आरमान टेन्ट हाऊसच्या गोडावूनला बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत मंडपाचे साहित्य, खुर्च्या, टेबल, पडदे, आणि इतर डेकोरेशनचे सामान जळून खाक झाले. या दुर्घटनेत २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आरमान टेन्ट हाऊसचे मालक अनिस शफी पिंजारी हे एका हाताने अपंग असून, या व्यवसायावरच त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. घटना घडली त्यावेळी पिंजारी हे जेवणासाठी घरी गेले होते. त्याच दरम्यान, गोडावूनला अचानक आग लागली. गोडावूनमधून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पिंजारी यांना कळवले.

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, गोडावूनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

अनिस पिंजारी यांनी लग्नसराईसाठी अनेक कामे स्वीकारली होती. मात्र या आगीत मंडपाचे सर्व साहित्य जळून गेल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या घटनेचे कारण शॉर्टसर्किट असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here