जळगाव समाचार | १७ सप्टेंबर २०२५
शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेअंतर्गत 2666 शिक्षकांचे जिल्हांतर्गत स्थानांतरण निश्चित झाले आहे. व्हिन्सेस आयटी या संस्थेद्वारे ठरवून दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून, संबंधित शिक्षकांना नवीन शाळांवर पदस्थापना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार पार पाडल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळांवर कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही शाळा शून्य शिक्षकी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे आवश्यक पडताळणी करूनच शिक्षकांना कार्यमुक्त केले जाईल, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे.