जळगाव समाचार डेस्क;
जळगाव येथील रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयूर राजेंद्र शिंदे असे मयताचे नाव आहे. (Jalgaon)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील रामेश्वर कॉलनी येथे राहणारा मयूर राजेंद्र शिंदे हा तरुण बुधवारी चोपडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते, सर्व नाचण्यात मग्न होते, इतक्यात नाचतानाच अचानकपणे मयूर याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली कोसळला. नातेवाईकांनी मयूर याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉ. सागर पाटील यांनी त्याला तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शेषराव तोरे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, भाऊ, मुले असा परिवार आहे.

![]()




