T20 विश्वविजेता भारतीय संघ मायदेशी परतला…

 

स्पोर्ट्स, जळगाव समाचार डेस्क;

T20 विश्वचषक (T20 World Cup) विजेता भारतीय क्रिकेट (India) संघ गुरुवारी दिल्लीला पोहोचला टीम इंडिया एअर इंडियाच्या (Air India) विशेष विमानाने दिल्लीत उतरली. विश्वविजेत्या खेळाडूंचे विमानतळावर चाहत्यांनी जंगी स्वागत केले. आता भारतीय खेळाडू दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. जिथे जगज्जेत्या खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.
आज विश्वविजेता खेळाडू पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईला रवाना होतील. मुंबईच्या नरीमन पॉइंट ते वानखेडे मैदानापर्यंत ओपन बस मधून सायंकाळी 5 वाजेपासून खेळाडूंची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर खेळाडूंचा सत्कार वानखेडे मैदानात करण्यात येईल.
भारतीय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहतील त्या विमानतळावर आणि हॉटेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय संघ आज सकाळी 6.15 वाजता नवी दिल्लीत पोहोचला. चौथ्या श्रेणीतील वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्ये 3 दिवस अडकून पडल्यानंतर अखेर बुधवारी ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विशेष विमानाने दिल्लीला पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here