जळगाव समाचार डेस्क | १६ नोव्हेंबर २०२४
पारोळा-एरंडोल-भडगाव मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्वप्नील भगवान पाटील यांच्या प्रचाराला जोरदार वेग आला आहे. त्यांच्या प्रचारासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, प्रचारात मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनीही सहभाग घेतला आहे.
काल शहरात स्वप्नील पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत हास्यजात्र फेम हेमंत पाटील, रिल स्टार सागर-निखिल, तसेच लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सपकाळे यांनी हजेरी लावली. या प्रसिद्ध कलावंतांनी उपस्थित जनतेला स्वप्नील पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी कलावंतांनी स्वप्नील पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली.
स्वप्नील पाटील यांच्या प्रचार रॅलीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत स्वप्नील पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. गुलाबपुष्प, पुष्पहार, आणि घोषणांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी स्वप्नील पाटील यांच्यावर आपला विश्वास व्यक्त करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. स्वप्नील पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या भागाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्व देण्याचे आश्वासन दिले.
स्वप्नील पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सातत्याने मतदारांशी संपर्क साधत आहेत. त्यांच्या प्रचार मोहिमेत जनतेसाठी स्वतंत्र विकास योजनांचे आश्वासन आणि तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
पारोळा-एरंडोल-भडगाव मतदार संघात स्वप्नील पाटील यांना सामान्य नागरिकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, यंदाच्या निवडणुकीत या मतदार संघातील निकाल अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.

![]()




