जळगाव पाईप चोरी प्रकरण: सुनील महाजन यांना अटकपूर्व जामीन…

जळगाव समाचार डेस्क | २७ जानेवारी २०२५

जळगाव महापालिकेच्या पाईप चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

२ डिसेंबर २०२४ रोजी महापालिकेची जुनी पाईपलाइन चोरीचा प्रयत्न उघडकीस आला होता. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी योगेश बोरोले यांच्या तक्रारीवरून अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड आणि नरेंद्र पानगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात सुनील महाजन यांचे नाव समोर आले होते.

महाजन हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. पोलीस त्यांच्या शोधात होते आणि मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू केली होती.

महाजन यांनी अटक टाळण्यासाठी खंडपीठात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांची बाजू अँड. सागर चित्रे यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here