सेवानिवृत्त शिक्षकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या

जळगाव समाचार डेस्क|

सावखेडा येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेत एका सेवानिवृत्त शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राजेंद्र लोहारे (वय ६१) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. लोहारे यांनी दि.१० रोजी दुपारी पातोंडा पासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदी वरून उडी मारत आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ प्रदीप लोहारे यांना सायंकाळी कळताच त्यांनी नदीकाठी शोधाशोध केली.

शुक्रवारी सकाळी मुंगसे- दापोरी गावाच्या नदीकाठी मृतदेह आढळला आल्याचे समजले. अमळनेर पोलिस स्टेशनला नोंद होऊन, शविच्छेदनानंतर पातोंडा येथे अंत्यविधी करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,, दोन भाऊ, बहिण, असा परिवार आहे. ते माध्यमिक शिक्षक प्रदीप लोहारे यांचे मोठे बंधू तर अमळनेर एलआयसी ऑफिसर मयूर लोहारे यांचे वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here