जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
घरगुती वादातून पाचोरा शहरातील वैशाली अनिल पाटील (वय 42, रा. आशिर्वाद ड्रिमसिटी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 2 मार्च रोजी रात्री 10 वाजता घडली.
वैशाली पाटील आणि त्यांचे पती अनिल पाटील यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद होत असत. पतीकडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याने त्या मानसिक तणावात होत्या. अखेर त्यांनी आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच वैशाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा भाऊ गजानन पाटील यांच्या तक्रारीवरून अनिल पाटील (पती) आणि छबाबाई पाटील (सासू) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.