जळगाव समाचार डेस्क | ४ फेब्रुवारी २०२५
जळगाव तालुक्यातील कढोली गावातील ६१ वर्षीय व्यापारी गणेश बंडू बडगुजर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शिरसोली रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
गणेश बडगुजर हे धान्य व्यापार करत होते आणि व्यावसायिक कारणांसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाच्या ताणामुळे ते काही दिवसांपासून चिंतेत होते. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मिनाबाई, दोन मुलगे सचिन आणि आशिष, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गुलाब माळी आणि अनिल फेगडे करत आहेत.