बिबा नगर येथे ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

जळगाव समाचार | १ मार्च २०२५

जळगाव शहरातील बिबा नगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडली. समाधान रमेश शिरसाठ (वय ३२, मूळ रा. डांगरी, ता. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

समाधान शिरसाठ हे महावितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वीच ते बिबा नगर येथे पत्नी व दोन मुलांसह राहायला आले होते. शुक्रवारी पहाटे घरातील सर्वजण झोपेत असताना त्यांनी गळफास घेतला. सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या ही घटना लक्षात आली.

कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांच्या मदतीने समाधान शिरसाठ यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here