साईनगरमध्ये ४० वर्षीय व्यक्तिची गळफास घेऊन आत्महत्या…

 

जळगाव समाचार डेस्क | २१ जानेवारी २०२५

साईनगर परिसरातील प्रेमचंद भगवान पवार (वय 40) यांनी घराबाहेर छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेअकरा वाजता उघडकीस आली.

प्रेमचंद पवार हे एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत काम करत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते प्रामाणिकपणे मेहनत करत होते. सोमवारी त्यांच्या पत्नी पाहुण्यांना रिक्षा स्टॉपपर्यंत सोडण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी घरात एकटे असलेल्या प्रेमचंद यांनी छताला दोरीने गळफास घेतला.

पत्नी परत आल्यानंतर त्यांनी पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यांनी एकच आक्रोश केला. शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या बाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमचंद पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here