जळगाव समाचार, अमळनेर (प्रतिनिधी) |
खा. शि. मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे स्वागत करत शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या.
पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेतील उपशिक्षक एच. एस. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून सुबक व देखण्या मूर्ती घडवल्या. याप्रसंगी उत्कृष्ट मूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, राकेश साळुंके, सचिन अहिरे, कुशल पाटील, रोहित तेले, जी. एस. चव्हाण, सचिन पाटील, अमित पाटील यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.