जळगाव समाचार | ४ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून 15 मेपूर्वी दोन्ही निकाल जाहीर होतील.
यंदा परीक्षा 10 दिवस लवकर सुरू झाल्यामुळे निकालदेखील लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी नियोजन करता येईल.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान झाली होती, तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडली.
निकाल जाहीर करण्याआधी पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. निकाल mahresult.nic.in , mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर पाहता येईल.
दरम्यान, आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील ९९.९०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर आयएससी बारावी परीक्षेत ९९.८१% विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलचे इशमीत कौर आणि आरव बर्धन यांनी बारावीत १००% गुण मिळवले आहेत.